⚜️नवल⚜️

 ⚜️नवल⚜️

  आंब्याच्या झाडाला चार मोठेमोठे फणस आले. पोपटाची चोच निळी आहे. पाय न मारता व कोणतेही इंधन न लागणारी सायकल शास्त्रज्ञांनी तयार केली. एक शेळी माणसासारखे बोलते. या प्रकारची वाक्ये ऐकली किंवा वाचली, तर आपल्याला खूपच वेगळे वाटते. या सहसा किंवा कधीच घडू न शकणाऱ्या गोष्टी असतात. असे घडलेले जे पाहून आपल्याला वाटते, त्याला नवल वाटणे असे म्हणतात. नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. जगावेगळ्या म्हणजे आजपर्यंत जे घडत आले आहे, त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी घडल्यास या वाक्प्रचाराचा वापर केला जातो.