⚜️उतारा वाचन भाग ३८⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ३८⚜️

 एक होता ससोबा.  त्याला चित्रकामाची फार हौस होती. तऱ्हेतऱ्हेची चित्रे काढून त्यात रंग भरत असे. हत्ती रोज सशाला पाहत असे. हत्तीच्या मनात आले, जर सशाने मला रंगवले, तर मी किती सुंदर दिसेल! तुम्ही तर सुंदर रंगकाम करता. मला पण रंगवून दया कि ससा हत्तीला रंगवण्याचा विचार करु लागला. ससा खुशीत हत्तीला रंगवू लागला. हत्तीने आरशात पाहिले.आपले नवीन रुप पाहून तो फार खुश झाला. तेवढयात एकदम पाऊस आला. हत्तीचा रंग उतरु लागला. हत्ती आरशात पाहून निराश झाला. हत्तीने पुन्हा मनात विचार केला कि, आपल्या सर्वांचेच मूळ रुप सुंदर असते. हत्ती पुन्हा मनात खुश झाला.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) ससोबाला कशाची हौस होती ? 
२) चित्रकामाची हौस कोणाला होती ?
३) ससा कशात रंग भरत असे ?
४) सशाला कोण रोज पाहत असे ?
५) हत्तीच्या मनात कोणता विचार आला ?
६) हत्तीला रंगविण्याचा विचार कोण करू लागले ?
७) हत्तीला कोण रंगवू लागला ?
८) हत्ती का खुश झाला ?
९) हत्तीचा रंग कशामूळे उतरला ?
१०) हत्ती का निराश झाला ?
११) हत्तीने कोणता चांगला विचार केला ?
१२) वरील उताऱ्यात कोणते प्राणी आले आहे ?
१३) ससा कोणत्या रंगाचा असतो ? 
१४) हत्ती कोणत्या रंगाचा असतो ?
(१५) ससा आणि हत्ती यात कोणता प्राणी आकाराने मोठा आहे ?