⚜️उतारा वाचन भाग २०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग २०⚜️

मनीमाऊ एकदा आजारी पडली
उंदिरमामांची मजाच झाली
नाचू लागले ते घरभर
मनीला म्हणाले, "तू आम्हांला घर"
मनीमाऊ आपली हळूच उठली
उंदिरमामांनी धूम ठोकली.

⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) घरभर कोण नाचू लागले ?
२) आजारी कोण पडले ?
(३) मनीमाऊ कशी उठली ?
४) उंदिरमामांनी धूम का ठोकली ?
५) उंदिर मामाःची मज्जा का झाली ?
६) गाण्यात आलेली जोडाक्षरे शोधा व लिहा.
७) एकच अक्षर दोनदा आले आहे, असे जोडाक्षर कोणते ?
८) सर्वात जास्त अक्षरे असलेले शब्द किती व कोणते ?
(९) वरील कवितेचे अनुलेखन करा.
(१०) कवितेत कोणते दोन प्राणी आलेले आहेत.
(११) उंदिरमामा मनीमाऊला काय म्हणाले ?
(१२) आपल्या घरात आपणा कोणकोणते प्राणी पाळतो ?
(१३) उदिरमामा कोठे राहतो ?
(१४) तुम्हांला आवडणारे बालगीत लिहा.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421