⚜️उतारा वाचन भाग २⚜️
⚜️उतारा वाचन भाग २⚜️
माझ्या गावात 'भैरवी' या आमच्या ग्रामदेवतेचे देऊळ आहे. भैरवी नदीच्या काठी हे देऊळ आहे, म्हणून आमच्या गावाच्या देवीचे नाव भैरवी असावे. शहरातील चाकरमनी आणि गावकरी यांनी यथाशक्ती पण श्रद्धेने भैरवीचे देऊळ सजवले आहे. गाभारा, सभामंडप, पुढचे अंगण सारा परीसर कसा रेखीव नेटका आहे. या आमच्या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरते. भैरवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावाचा सामुदायिक सोहळा असतो. चैत्रातील पुनवेच्या मागे-पुढे पाच-दहा दिवस देवळाचा परिसर नुसता फुलून गेलेला असतो.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) लेखकाच्या गावात कोणत्या ग्रामदेवतेचे देऊळ आहे ?
२) ग्रामदेवतेचे देऊळ कोणत्या नदीकाठी आहे ?
३) गावच्या देवीचे नाव भैरवी कसे पडले असावे ?
४) भैरवी देवीचे देऊळ कोणी सुंदर सजवले आहे ?
५) भैरवी देवीच्या देऊळाचे वर्णन कसे केले आहे ?
६) भैरवी या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी कधी भरते ?
७) गावाचा सामुदायिक सोहळा कोणता असते ?
८) देवळाचा परीसर कधी फुलून गेलेला असतो ?
९) या उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा.
१०) तुमच्या गावाची ग्रामदेवता कोणती ?
११) तुमच्या गावच्या जत्रेविषयी पाच वाक्ये लिहा.
१२) सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
(१३) मंदिर या शब्दाला कोणता समानार्थी शब्द उताऱ्यात आला आहे ?
१४) वरील उताऱ्यात एकूण किती शब्द आहे आहेत ?
१५) उताऱ्याची सुरुवात कोणत्या शब्दाने झाली आहे ?
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421