⚜️उतारा वाचन भाग ५३⚜️
राधिका मावशी घरी आली. तिने बाळासाठी खेळणी आणली. तिला बघून सर्वांना खूप आनंद झाला. नंतर ती व घरातील सर्व मंडळी बागेत फिरायला गेली. तिच्यासाठी आईने गोड गोड पदार्थ केले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) घरी कोण आली ?
२) राधिका मावशीने बाळासाठी काय आणले ?
३) सर्वांना आनंद का झाला ?
४) राधिका मावशी व घरातील मंडळी कोठे फिरायला गेली
५) राधिका मावशी साठी आईने काय तयार केले ?
६) बाळासाठी खेळणी कोणी आणली ?
७) आईने गोड-गोड पदार्थ कोणासाठी केले ?
८) तुला माहित असलेल्या गोड पदार्थांची नावे लिही.
९) तुझ्या माहितीतील लहान बाळासाठी वापरल्या जाणाऱ्या खेळण्यांची नावे लिही.
१०) या उताऱ्यात 'राधिका मावशी' करीता कोणकोणती सर्वनामे वापरली आहेत.
११) 'राधिका मावशी घरी आली' या वाक्यातील नाम ओळख.
१२) 'राधिका मावशीने बाळासाठी खेळणी आणली 'या वाक्यातील क्रियापद कोणते ?
१३) 'मावशी' कोणाला म्हणतात ?
१४) 'गोड' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
१५) 'मावशी' या शब्दात कोणत्या किटकाचे नाव लपले आहे. ते शोध व लिही.