⚜️उतारा वाचन भाग ४८⚜️
समाजातील कर्म करणारा, कष्ट करणारा प्रत्येक माणूस श्रेष्ठ आहे. मग तो ऋषिमूनी असो, शेतकरी, मजूर, कामगार, चांभार, कुंभार, शिंपी, भंगी असो. उलट श्रमजीवी वर्गच श्रेष्ठ म्हणणे आवश्यक आहे.या श्रमजीवी वर्गावरच आपण जगत असतो. साने गुरुजी म्हणतात, “श्रमजिवी माणसांच्या अंगातून गळणारे घामाचे पाणी हे सर्व गंगा- यमुनाच्या, समुद्राच्या पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घामाचे पाणी जगाचे पोषण करीत असते. कितीही पाऊस पडला तरी शेतकऱ्याने घामाचा पाऊस पाडला नाही तर माणसांना दाणे कसे मिळणार ? पाखरांना दाणे मिळणार नाहीत, सारी सृष्टी नष्ट होईल. म्हणूच श्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) समाजातील कोणत्या व्यक्ती श्रेष्ठ आहे ?
२) आपण कोणावर जगत असतो ?
३) साने गुरुजी श्रमाच्या बाबतीत काय म्हणतात ?
४) कोणते पाणी सर्वश्रेष्ठ आहे ?
५) जगाचे पोषण कोणते पाणी करते ?
६) सारी सृष्टी का नष्ट होईल असे साने गुरुजींना वाटते ?
७) कशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ?
८) श्रमजीवी वर्ग कोणता आहे ?
(९) 'श्रमाचे महत्त्व' तुमच्या शब्दात सांगा.
१०) 'श्रम' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.