⚜️उतारा वाचन भाग ५६⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ५६⚜️

  पोळ्याचा सण होता. म्हैसगावात धमाल उडालेली होती. शेतकऱ्यांनी आपपल्या बैलांना अंघोळी घालून स्वच्छ केले होते. लाल, हिरव्या भडक रंगांनी सर्व बैलांना रंगवले होते. रंगीत शिंगावर रुपेरी बेगड चमकत होती. लोकरीचे रंगीत, गुबगुबीत गोंडे डुलत होते. पाठींवर सुरेख झुली टाकलेल्या होत्या. गळ्यांत कवड्यांच्या माळा घातल्या होत्या. घुंगरांचे पट्टेही खुळखुळत होते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) कोणता सण होता ?
२) कोणत्या गावात धमाल उडालेली होती ?
३) बैलांना अंघोळी घालून स्वच्छ कोणी केले होते?
४) बैलांना कोणत्या रंगांनी रंगवले होते ?
५) रंगीत शिंगांवर काय चमकत होती ?
६) बैलांच्या पाठीवर काय टाकल्या होत्या ?
७) बैलांच्या गळ्यात काय घातल्या होत्या ?
८) काय खुळखुळत होते ?
९) वरील उताऱ्यात कोणत्या रंगांची नावे आलेली आहेत ?
१०) गोंडे कसे होते ?
११) 'सुरेख ' या शब्दाला समानार्थी शब्द सांग.
१२) 'घुंगराचा' आवाज कसा असतो ?
१३) 'धमाल उडणे 'वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर.
१४) 'म्हैसगाव' या शब्दात कोणत्या प्राण्याचे नाव आले आहे ?
१५) 'माझा आवडता सण' यावर पाच ओळी लिही.