⚜️उतारा वाचन भाग ४६⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ४६⚜️

    जनतेमध्ये एकात्मता असेल तर राष्ट्र टिकते. वृक्षावरील एका फळावरुन साऱ्या वृक्षाची किंमत ठरते. तसेच राष्ट्राच्या एखादया व्यक्तीच्या विद्वत्तेवरून साऱ्या राष्ट्राची योग्यता ठरविली जाते. म्हणून राष्ट्रीय एकात्मता राखण्याची जबाबदारी ही आम्हां सर्वांची आहे. राष्ट्रीय एकात्मता व अखंडता दृढ करण्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे. भारतामध्ये जात, धर्म प्रांत, भाषा याबाबतीत भिन्नता असली तरी विवेधतेत एकता बघावयास मिळते. "

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) राष्ट्र कसे टिकते ?
२) वृक्षाची किंमत कशी ठरते ?
३) राष्ट्राची योग्यता कशी ठरवली जाते ?
४) आम्हां सर्वांची कोणती जबाबदारी आहे ?
५) राष्ट्राची एकात्मता राखण्याची जबाबदारी आपली का आहे ? 
६) अविरत प्रयत्न कशासाठी केले पाहिजे ?
७) भारतात कशाच्या बाबतीत भिन्नता आढळून येते ?
८) विविधतेत एकता कोठे बघावयास मिळते ?
९) वरील उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.
१०) 'राष्ट्र' हा शब्द वरील उताऱ्यात किती वेळा आला आहे ?