⚜️उतारा वाचन भाग ७०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ७०⚜️

    उन्हाळा संपला. पावसाळा सुरु झाला. काळे काळे ढग आभाळात जमू लागले.वारा जोराने वाहू लागला. मुसळधार पाऊस सुरु झाला. पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते. या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) कोणता ऋतू संपून पावसाळा सुरु झाला ?
२) उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो ?
३) आकाशात काय जमा होऊ लागले ?
४) पाऊस कसा सुरु झाला ?
५) पिंपळाच्या झाडावर कोण बसले होते ?
६) माकड कोठे बसले होते ?
७) कोण मुसळधार पावसात भिजून गेले ?
८) आभाळात काय जमू लागले ?
९) जोराने काय वाहू लागले ?
१०) वरील उताऱ्यात ढगांचे वर्णन कसे केले आहे ?
११) 'पाऊस' या शब्दात कोणता खाण्याचा पदार्थ लपलेला आहे.
१२) 'पावसाळा सुरु झाला' या वाक्यातील क्रियापद कोणते ?
१३) 'पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते' या वाक्यातील नामे शोध.
१४) 'मुसळधार' या शब्दापासून आणखी नवीन शब्द तयार कर.
१५) 'मला आवडणारा पाऊस' या विषयावर दहा ओळी लिही.
१६) वरील उताऱ्यात कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे.