⚜️विद्याधन - सामान्यज्ञान⚜️
⚜️उत्तरसूची⚜️
(१) शेंगा येणा-या वनस्पती.
उत्तर :- गवार, गुलमोहर, शेवगा, मटार.
(२) एक बी असलेली फळे.
उत्तर :- आंबा, आवळा, बोर, खजूर.
(३) अनेक बिया असलेली फळे.
उत्तर :- सीताफळ, फणस, टरबूज, पेरू.
(४) रगीत फुले येणाऱ्या वनस्पती.
उत्तर :- गुलाब, जास्वंदी, झेंडू, सूर्यफूल.
(५) कठीण कवचाची फळे.
उत्तर :- नारळ, अक्रोड, कवठ, बदाम.
(६) काटेरी वनस्पती.
उत्तर :- करवंद, बोर, गुलाब, लिंबू.
(७) पातळ पदार्थ.
उत्तर :- दूध, ताक, पाणी, सरबत.
(८) तेलबिया.
उत्तर :- शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, मोहरी.
(९) कडधान्ये.
उत्तर :- वाटाणा, मटकी, चवळी, उडीद.
(१०) तृणधान्ये.
उत्तर :- गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी.
(११) पालेभाज्या.
उत्तर :- मेथी, पालक, शेपू, कोबी.
(१२) भक्कम खोडाच्या वनस्पती.
उत्तर :- वड, पिंपळ, चिंच, आंबा.
===================================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
===================================