⚜️नारळ⚜️
नारळ हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे फळ आहे. कोवळ्या नारळाला शहाळे असे म्हणतात. त्यात भरपूर पाणी असते. हे पाणी थंड व गोड असते. पाण्यात शक्ती वाढवणारे घटक असतात. या पाण्यात 'ती' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आजारी किंवा अशक्त व्यक्तींना शक्ती देणारे व पचनासाठी सुलभ असणारे असे हे पाणी आहे. जून नारळात थोडे पाणी व खोबरे असते. खोबरे हा पौष्टिक पदार्थ आहे. खोबऱ्याचा उपयोग करून अनेक पदार्थ बनविले जातात. खोबरे वाळवून साठवून ठेवता येते. वाळलेल्या खोबऱ्यामधून तेल काढले जाते. तेलाचा अंगाला आणि केसांना लावण्यासाठी उपयोग केला जातो. वाळलेले खोबरे वेगवेगळ्या अन्नपदार्थात वापरले जाते. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा कोणता ना कोणता उपयोग केला जातो. त्यामुळे नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असेही म्हटले जाते.
नारळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. नारळ हे सर्व गोष्टीसाठी उपयुक्त फळ आहे. नारळाला वारहून त्याचे कच्चे खोबरे,सुखे खोबरे या नारळ पाणी यांसारखे अनेक खाण्याचे फायदे आहेत. नारळाचा उपयोग तेलासाठी सुद्धा उपयोग केला जातो. व तेल आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
नारळाचे तेल डोक्याला सुद्धा लावत असतात. या तेलामुळे आपले केस मजबूत सुद्धा होते आणि आपले डोके सुद्धा चांगले राहत असते.नारळ या फळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहेत. या मध्ये अनेक जीवनसत्वे आहेत नारळ खाल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. नारळ हे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत.
मधुमेहासाठी:– नारळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ज्या माणसाला मधुमेहाचा त्रास आहे त्याने कच्चे नारळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. नारळांमुळे इन्सुलेशन तयार जाण्यासाठी फायदा मिळत असतो. या मुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी:–
मानवाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कच्चे खोबरे खाणे फायदेशीर आहेत. नारळ या फळामध्ये अँटी बॅक्टेरिया, अँटी परजीवी हे मुबलक गुणधर्म आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला काही होणार नाही याची काळजी घेण्याचे काम करत असते. आपले शरीर त्यामुळे संसर्ग होण्यापासून रोखते आणि आपले शरीर गंभीर रोगांपासून दूर ठेवण्यास मदत मिळत असते.
ऊर्जा वाढविण्यासाठी:–
आपल्या शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी कच्चे नारळ खाणे गरजेचे आहे कारण या फळामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्या शरीराची चरबी कमी करून ते आपल्या शरीरातील ऊर्जा वाढविण्यास फायदेशीर ठरते. आणि नारळाचे सेवन केल्याने आपल्याला भूक सुद्धा लागत नाही. व आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते.
हाडे आणि दातांसाठी नारळाचे फायदे :–
नारळ या फळामध्ये भरपूर व्हिटॅमिन असते. कच्या नारळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे खूप प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहत असतात. यामुळे कच्चे खोबरे खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. ज्या माणसाला दाताचा त्रास आहे त्या व्यक्तीने कच्चे खोबरे खाण्याचे करावे कारण या फळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात जे आपल्या दातांसाठी फायदेशीर ठरतात.
कर्करोगासाठी नारळाचे फायदे:–
कर्करोगासाठी सुखे खोबरे खाणे हे महत्वाचे आहे कारण शरीरात असलेलं कर्करोगाच्या पेशी असतात त्यापासून लढण्यासाठी सुखे खोबरे खाणे फायदेशीर आहेत. सुक्या खोब्रामध्ये खूप पोषक घटक आहेत ते कर्करोगासाठी लाभदायक आहेत. या मुळे कोलन कॅन्सर व ब्रेस्ट कॅन्सर पासून वाचण्यास मदत मिळत असते. पचनास जर त्रास असेल तर त्याने सुखे खोबरे खाणे फायदेशीर आहेत. सुखे खोबरे हृदय रोगांसाठी सुद्धा फायदशीर आहे.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी:–
नारळ हे फळ शरीरातील अनेक आजारांवर फायदेशीर फळ आहे. या फळामध्ये अनेक गुणधर्म आहे. तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जर वाढले असेल तर नारळ जर खाल्ले तर ते कमी करण्यास मदत मिळते. तुम्हाला हृदयाच्या समस्या असल्यास हे फळ खाल्ल्याने ते कमी होते. नारळामध्ये असणारे सॅच्युरेटेड फॅट मुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढवत असते व खराब असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिले पाहिजे याची खबरदारी घेत असते. तुमच्या शरीरातील सर्व रोगांना नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असते.
नारळ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे परंतु जास्त प्रमाणात खाल्याने ते ठोकादायक सुद्धा आहेत. मधुमेहासाठी नारळ हे काही प्रमाणात नुकसान दायक आहे. कारण नारळाच्या पाण्यामध्ये कॅलरीज कमी राहतात. या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्याने साखरेची पातळी वाढत असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी नुकसानदायक आहेत.
नारळाचे पाणी जास्त प्रमाणात पिल्याने आपल्या शरीरात लठ्ठपणा चा धोका वाढू लागतो. आपल्या शरीरात लठ्ठपणा वाढले तर इतर आजार निर्माण होऊ शकतात. नारळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदय रोगांसाठी नुकसानदायक आहेत.
यासाठी नारळाचे सेवन हे कमी प्रमाणात करावे. नारळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. हे फळ सर्व कामामध्ये मदत मिळते. या फळाला योग्य रित्या खाल्ले तर ते फायदेशीर आहेत.नारळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटांचे आजार सुद्धा निर्माण होऊ शकतात यामुळे तुमचे पोट दुखणे या पोटांमध्ये गॅस निर्माण होते त्यामुळे तुमच्या पोटाला खूप त्रास होऊ शकतो.
यासाठी नियंत्रित पने खाणे गरजेचे आहेत. गंबीर आजारांसाठी जर नारळ खायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते खाण्याचे करावे नाहीतर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. चांगल्या पद्धतीने खाणे गरजेचे आहेत. कुणाल नारळाची एलर्जी पण राहू शकते त्यासाठी
माहिती घेऊनच नारळ खाण्याचे करावे. कमी प्रमाणात जर खाल्ले तर ते चांगले आहेत.