⚜️उतारा वाचन भाग ५५⚜️

⚜️उतारा वाचन भाग ५५⚜️

    चंदन, चंपा यांनी फुले आणली. गौतम, गौरी यांनी हार बनवले. एकनाथ, काशिनाथ यांनी गुच्छ बनवले. पाहुणे आले. फोटोला हार घातला. मुलांनी पाहुण्यांना गुच्छ दिले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) फुले कोणी आणली ?
२) गौतम, गौरीने काय बनवले ?
३) फुलांचे गुच्छ कोणी तयार केले ?
४) फोटोला हार कोणी घातला ? 
५) मुलांनी पाहुण्यांना काय दिले ?
६) हार कोणी बनवले ?
७) चंदन, चंपा यांनी काय आणले ? 
८) 'हार' या शब्दाचे दोन अर्थ सांग.
९) उताऱ्यात आलेल्या मुलांची नावे लिही.
१०) उताऱ्यातील अनुस्वारयुक्त शब्द लिही.
११) तुला माहित असलेल्या फुलांची नावे वहीत लिही.
१२) 'एकनाथ' या शब्दात लपलेला अंक शोध.
१३) 'फोटो' या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो ?
१४) 'पाहुणा' या शब्दाचे अनेकवचन कर.
१५) तुला आवडणाऱ्या फुलांचे चित्र वहीत काढ.