⚜️उतारा वाचन भाग ६३⚜️
एकदा उंदिर स्वयंपाक घरात जाताना गंपूला दिसला. त्याने झाडू घेऊन हळूच त्याचा पाठलाग केला, तर उंदिरमामा मोरीत बसलेले खरकट्यावर ताव मारत. गंपूने उंदराच्या दिशेने झाडू फेकला. त्यामुळे माठ फुटला. खोलीभर पाणीच पाणी झाले.कसला आवाज झाला म्हणून ताई लगबगीने बघायला आली.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) स्वयंपाक घरात जाताना गंपूला कोण दिसले ?
२) गंपूने काय घेऊन उंदराचा पाठलाग केला ?
३) उंदिर कोठे जाताना गंपूला दिसला ?
४) उंदिरमामा कशावर ताव मारत बसले होते ?
५) उंदिरमामा कोठे बसले होते ?
६) गंपूने उंदराच्या दिशेने काय फेकले ?
७) माठ कसा फुटला ?
८) खोलीभर पाणीच पाणी का झाले
९) ताई लगबगीने का आली
१०) समानार्थी शब्द लिहा.
पाणी, आवाज
११) 'पाठलाग' या शब्दात आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाचे नाव आले आहे ?
१२) वाक्यात उपयोग करा.
ताव मारणे
पाठलाग करणे.
१३) वरील उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द वहीत लिही.
१४) घरात उंदराने कोणकोणते नुकसान केले ?