⚜️उतारा वाचन भाग ६५⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ६५⚜️

     एक कुत्रा अन्नाच्या शोधात इकडे-तिकडे फिरत होता. फिरुन खूप दमला. शेवटी थकून एका झाडाखाली बसला. बसल्यानंतर इकडे तिकडे पाहत असताना भाकरीचा तुकडा त्याला सापडला. भाकरीचा तुकडा पाहून कुत्रा खूप आनंदित झाला. कुत्र्याला वाटले हा भाकरीचा तुकडा कोणी बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन खावा. म्हणून तो तेथून पळत पळत एका तळ्याच्या पुलावर आला. त्याने पाण्यात डोकावून बघितले. कुत्र्याला पाण्यात आपलेच प्रतिबिंब दिसले. त्याला वाटले याही कुत्र्याकडे भाकरीचा एक तुकडा आहे.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) अन्नाच्या शोधात इकडेतिकडे कोण फिरत होते ?
२) कुत्रा इकडेतिकडे का फिरत होता ?
३) फिरुन कोण दमले ?
४) थकल्यानंतर कुत्रा कोठे बसला ?
५) कुत्र्याला काय सापडले ?
६) काय बघून कुत्रा आनंदित झाला ?
७) कुत्रा का आनंदित झाला असावा असे तुला वाटते ?
८)भाकरीचा तुकडा मिळाल्यावर कुत्र्याला काय वाटले ?
९)भाकरीचा तुकडा घेऊन कुत्रा कोठे गेला ? 
१०) कुत्र्याला पाण्यात कोण दिसले ?
११)प्रतिबिंब पाहून कुत्र्याला काय वाटले ?
१२)तुला माहित असलेले जोडशब्द लिही. उदा. इकडे तिकडे
१३)'माझा आवडता प्राणी कुत्रा' या विषयावर पाच ओळी लिही.
१४)वरील उताऱ्यात कोणता प्राणी आला आहे ?
१५)'भाकरीचा तुकडा पाहून कुत्रा खूप आनंदित झाला.' या वाक्यातील क्रियापद कोणते ?
१६)अनुस्वारयुक्त कोणते शब्द उताऱ्यात आले आहेत ?