⚜️उतारा वाचन भाग ३०⚜️
भारतात उंच पर्वत आहेत. घनदाट जंगले आहेत. लहान मोठ्या नदया आहेत. गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात. ते वेगवेगळे सण साजरे करतात . भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू,तांदूळ,ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) आपला देश कोणता आहे ?
२) उंच पर्वत कोठे आहेत ?
३) भारतातील जंगले कशी आहेत ?
४) नया कशा आहेत ?
५) नद्यांकाठी काय आहेत ?
६) लोक कोठे राहतात ?
७) भारतातील लोकांचे पोषाख कसे असतात ?
८) भारतातील लोकांच्या भाषा कशा आहेत ?
९) वेगवेगळे सण कोठे साजरे होतात ?
१०) भारतात कोणकोणती पिके घेतली जातात ?
११) कडधान्यांची नावे सांगा.
१२) तुम्ही कोणकोणती धान्ये खातात त्यांची नावे लिहा.