⚜️उतारा वाचन भाग ६८ ⚜️
आकाशात ढग जमा झाले. हॅरिसन बँच च्या शाळेत पत्र्यावर मोर येऊन बसले. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. मुले शाळेच्या आवारात नाचू लागली. मोरांनीसुद्धा पिसारा फुलवून नाच सुरु केला.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) आकाशात काय जमा झाले होते ?
२) कोणत्या शाळेच्या पत्र्यावर मोर येऊन बसले होते ?
३) झाडावर कोणाचा किलबिलाट ऐकू येऊ लागला होता
४) पावसाचे कसे थेंब पडू लागले ?
५) मुले कोठे नाचू लागली ?
६) मोरांनी कसा नाच सुरु केला ?
७) 'आकाशात' या शब्दात दडलेले आणखी शब्द शोध.
८) वरील उताऱ्यात कोणत्या पक्ष्याचा उल्लेख आला आहे ?
९) आवाजदर्शक शब्द लिही. उदा. किलबिलाट
१०) 'आवारात' या शब्दात 'पवन' या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आला आहे.
११) 'पाऊस' या विषयावर छान चित्र काढ.
१२) 'पाऊस' या विषयावर पाच ओळी लिही.
१३) 'मुले शाळेच्या आवारात नाचू लागली.' या वाक्यातील क्रियापद ओळख.
१४) 'मोरांनी पिसारा फुलवून नाच सुरु केला' या वाक्यातील नाम ओळख.
१५) 'झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला' या वाक्यातील अनुस्वारयुक्त शब्द लिही.