⚜️उतारा वाचन भाग ३४ ⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ३४ ⚜️

   फुलसिंगने आंबा खाल्ला. आंब्याची कोय त्याने मातीत फेकली. पावसाळा आला. भरपूर पाऊस झाला. शेत शिवार हिरवेगार झाले. मातीत फेकलेल्या आंब्याच्या कोईला कोंब फुटला. पुढे काही दिवसांनी कोंबाचे रोप झाले. इवल्याशा रोपाला कोवळी कोवळी पाने फुटली. फुलसिंगला खूप आनंद झाला. फुलसिंगने पालवी फुटलेल्या कोवळ्या रोपाला कुरवाळले, तेव्हा इवलेसे रोप पुन्हा गोड हसले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) फुलसिंगने काय खाल्ले ?
२) फुलसिंगने काय मातीत फेकले ?
३) आंबा कोणी खाल्ला ?
४) उताऱ्यात कोणता ऋतू चा उल्लेख आला आहे ?
५) काय हिरवेगार झाले ?
६) फुलसिंगने आंब्याची कोय कोठे फेकली होती ?
७) कोंबाचे काय तयार झाले ?
८) कोवळी कोवळी पाने कशाला फुटली ?
९) कोणाला खूप आनंद झाला ?
१०) इवलेसे रोप पुन्हा गोड का हसले ?
११) 'फुलसिंगने आंबा खाल्ला' या वाक्यातील क्रियापद कोणते ?
१२) तुम्हांला कोणकोणती झाडे लावायला आवडतील त्यांची नावे सांगा.