⚜️ब्रेक्स⚜️
एकदा फिजिक्सच्या टिचरने मुलांना प्रश्न विचारला, "कारमधे ब्रेक्स का लावलेले असतात ?"
त्यावर निरनिराळी उत्तरे आली.
"थांबण्यासाठी"
"वेग कमी करण्यासाठी"
"अपघात टाळण्यासाठी"
"परंतू सर्वात चांगले उत्तर होते,"
"जास्त वेगाने जाता येण्यासाठी..!!"
गोंधळले असाल ना अशा उत्तराने..... मग असे कसे..? जरा विचार करा.....! जर तुमच्या कारमधे ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल..? कारला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.
जीवनातही तुम्हाला आई, वडील, सासु सासरे, बायको, कुटुंब इ. रूपात ब्रेक्स मिळतात. तुम्हाला वाटते की, ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी चिडचिडे होतात. परंतु लक्षात ठेवा, जीवनात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता. म्हणूनच जीवनात अधुनमधून येणाऱ्या अशा ब्रेक्सची जाण ठेवा.