⚜️विद्याधन उपक्रम - गणित⚜️
उत्तरसूची
एका शब्दात उत्तरे सांगा.
(१) साठ सेकंदांचा कालावधी.
उत्तर :- मिनिट
(२) साठ मिनिटांचा कालावधी.
उत्तर :- तास
(३) चोवीस तासांचा कालावधी
उत्तर :- दिवस
(४) सात दिवसांचा कालावधी.
उत्तर :- आठवडा
(५) पंधरा दिवसांचा कालावधी
उत्तर :- पंधरवडा
(६) तीस दिवसांचा कालावधी.
उत्तर :- महिना
(७) बारा महिन्यांचा कालावधी.
उत्तर :- वर्ष
(८) सूर्योदयाची दिशा.
उत्तर :- पूर्व
(९) सूर्यास्ताची दिशा.
उत्तर :- पश्चिम
(१०) पूर्व व उत्तर यांमधील दिशा.
उत्तर :- ईशान्य
(११) पूर्व व दक्षिण यांमधील दिशा
उत्तर :- आग्नेय
(१२) दक्षिण व पश्चिम यांमधील दिशा.
उत्तर :- नैर्ऋत्य
(१३) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा.
उत्तर :- वायव्य
(१४) उत्तर दिशेसमोरील दिशा.
उत्तर :- दक्षिण
(१५) दक्षिण दिशेसमोरील दिशा.
उत्तर :- उत्तर
(१६) पृथ्वीचा आकार.
उत्तर :- गोल
(१७) चांदण्यांचा प्रकाश.
उत्तर :- चांदणे
(१८) भारतीय सौर वर्षाचे महिने.
उत्तर :- बारा
(१९) ग्रेगोरियन (इंग्रजी) वर्षाचे महिने
उत्तर :- बारा
(२०) मुख्य दिशा.
उत्तर :- चार
------------------------------
(२१) उपदिशा
उत्तर :- चार
------------------------------
(२२) एका आठवड्याचे दिवस.
उत्तर :- सात