⚜️आंतरीक रंग⚜️
एका रस्त्याने दोन वाटसरू चालले होते. त्यांच्यापैकी एकाला झाडाच्या खोडावर बसलेला एक सरडा दिसला. तो कोणता प्राणी आहे हे पाहण्यासाठी तो मनुष्य त्या झाडापाशी गेला असता, त्याला तो सरडा पिवळ्या रंगाचा दिसला. त्या वाटसरूने यापूर्वी कधीही सरडा पाहिला नसल्याने तो दुस-या वाटसरूकडे गेला व म्हणाला,'' अरे मित्रा पटकन बघ, त्या झाडाच्या खोडावर बघ कुठलातरी पिवळ्या रंगाचा प्राणी बसला आहे.'' दुसरा वाटसरू त्या झाडापाशी गेला तर तर त्याला तो प्राणी लाल रंगाचा असल्याचे आढळून आले. दुसरा वाटसरू पहिल्याकडे जाऊन म्हणाला,'' अरे मूर्खा, तुला तर लाल आणि पिवळा यातील फरक देखील कळेनासा झाला की काय? तो प्राणी तर लाल रंगाचा आहे,'' त्या सरड्याच्या रंगावरून दोघांमध्ये भांडण सुरु झाले, व दोघेही मोठमोठ्याने भांडू लागले. तिथून जाणा-या एका तिस-या वाटसरूने हे भांडण ऐकले व तो त्या दोघांच्या भांडणामध्ये पडला. दोघांनी तिस-याला विचारले,''तुम्ही शहाणे दिसता, तुम्हीच ठरवा की झाडावर दिसणा-या त्या प्राण्याचा रंग कोणता आहे.'' तिस-याने लांबूनच त्या प्राण्याकडे पाहिले व तो प्राणी म्हणजे सरडा आहे हे ओळखून तो म्हणाला,'' तुम्ही दाखवता तसाच एक प्राणी मी कालच पकडून माझ्याजवळच्या डबीत ठेवला आहे. तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही दाखवता त्या सरड्यापाशी न जाता मी माझ्या सरड्याच्या रंगावरून तुम्हाला सांगतो की त्याचा रंग काळसर पांढरा आहे.''