⚜️इमानी मुंगूस⚜️

 ⚜️इमानी मुंगूस⚜️ 

   एका कुटुंबात सखाराम आणि सुमिञा पती पत्नी राहतहोते. त्यांना मोहन नावाचा एक छोटा मुलगा होता. त्यांनी घरात मुंगूस पाळला होता. मोहन आणि मुंगूस हे दोघे एकमेकांच्यावर खूप प्रेम करायचे.
  एके दिवशी सखाराम त्याच्या शेतावर गेला होता.आणि सुमिञा कामासाठी बाहेर गेली होती.मुंगूस त्याच्या पाळण्याजवळ बसून त्याचे रक्षण करत होता.इतक्यात एक साप त्याला दिसला. मुंगूसाने सापावर झडप घातली आणि त्याला ठार केले.
 थोड्याच वेळात मुंगूसाला आपली मालकिण (सुमिञा) येताना दिसली. मालकिणीचे स्वागत करण्यासाठी तो धावतच दरवाजापाशी गेला. सुमिञाने मुंगूसाचे रक्तबंबाळ झालेले तोंड पाहीले. मुंगूसाने आपल्या बाळाला ठार मारले असावे, अशी भीती तिला वाटली.आणि तिने रागारागाने ओसरीजवळ पडलेली सळई उचलून मुंगूसाला ठार केले. आणि धावतच ती मोहन जवळ गेली. बघते तर काय पाळण्यात मोहन खुदूखुदू हसत होता.
    एवढयात तिचे लक्ष मेलेल्या सापाकडे गेले. घडलेला सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. तिला तिची चूक उमगली. त्या  निष्पाप, विश्वासू मुंगूसालाच तिने ठार मारले होते त्याचे तिला खूप दुःख झाले. पण आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नव्हता.
तात्पर्यः- कृती करण्यापूर्वी नीट विचार करावा'.