⚜️कविता म्हणींची⚜️
कर नाही त्याला डर कशाला ?
पुढच्यास ठेस मागचा शहाणा झाला
झाकली मूठ सव्वा लाखाची,
मेल्या शिवाय जात नाही खोड जित्याची !
अंथरून पाहुन पाय पसरावे,
हातचे सोडून पळत्या पाठी का लागावे ?
मनी वसे ते स्वप्नी दिसे,
नावडतीचे मीठ आळणी असे
हातच्या कंकणाला आरसा कशाला?
दोघांचे भांडण लाभ तिसऱ्याला
गोगलगाय अन पोटात पाय,
गाढवाला गुळाची चव काय !
खायला काळ अन भुईला भार,
प्रयत्नांतीच परमेश्वर भेटणार
घरोघरी मातीच्याच चुली असणार,
पळसाला पाने तिनच येणार
साखरेचे खाणार त्याला देव देणार,
टाकीचे घाव सोसून देवपण येणार
मोठा आशय थोडक्यात सांगणार
म्हण भाषेला सौंदर्य प्राप्त करणार...