⚜️विद्याधन उपक्रम - सामान्य विज्ञान⚜️

⚜️विद्याधन उपक्रम - सामान्य विज्ञान⚜️ 
उत्तरसूची 

एका शब्दात उत्तरे सांगा.

(१) चवीचे प्रकार किती ?

उत्तर :- चार


(२) चवीचे प्रकार कोणते ?

उत्तर :- गोड, कडू, आंबट, खारट.


(३) ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?

उत्तर :- ज्ञान देणारे अवयव.


(४) आपल्याला किती ज्ञानेंद्रिये आहेत ?

उत्तर :- पाच

 

(५) ज्ञानेंद्रियांची नावे सांगा ?

उत्तर :- डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा.


(६) डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो ?

उत्तर :- पाहण्यासाठी.


(७) कानाचा उपयोग कशासाठी होतो ?

उत्तर :- ऐकण्यासाठी


(८) नाकाने आपल्याला कोणते ज्ञान होते ?

उत्तर :- वास घेणे.

 

(९) जीभेने आपल्याला कोणते ज्ञान होते ?

उत्तर :- चव समजते.

 

(१०) शरीरावरील कातडीला काय म्हणतात ?

उत्तर :- त्वचा


(११) त्वचेमुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्ञान होते ?

उत्तर :- स्पर्शज्ञान


(१२) दातांचा उपयोग कोणता ?

उत्तर :- अन्न चावून खाण्यासाठी.