⚜️अंक १ ते १०⚜️
एक बसतो एकटा, दोन शोधतो दुक्कल
तीन म्हणतो करीन सहाचीच नक्कल
चार खातो फार, पाच करतो नाच
सहा म्हणतो माझ्या मागे तीनाचाच जाच
सात बसतो गात, आठ चालतो ताठ
नवाच्या तर आहे शेंडीला गाठ
दहा मात्र वहा, चाले रस्ता वाकून
शून्याचे गाठोडे पाठीवर टाकून.