⚜️दत्त दिगंबर दैवत माझे⚜️
दत्त दिगंबर दैवत माझे,
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे ॥धृ॥
अनुसयेचे सत्व आगळे,
तिन्ही देवही केली बाळे
त्रिमूर्ती अवतार मनोहर,
दिनोध्दारक त्रिभुवन गाजे ॥१॥
तीन शीरे कर सहा शोभती,
हास्य मधुर प्रभु वदनाभरती
जटा शुभ्र शिरी पायी खडावा,
भस्मविलोपीत कांती साजे ॥२॥