⚜️सर्वात्मका शिवसुंदरा⚜️

 ⚜️सर्वात्मका शिवसुंदरा⚜️

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना 
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये, सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ।।१।।

श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले, पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ।।२।।

करुणाकरा करुणा तुझी, असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ।।३।।

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.