⚜️उतारा वाचन भाग ७१⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ७१⚜️

     एका जंगलात एक सांबर राहत होते. एकदा ते पाणी पिण्यासाठी तळ्यावर गेले. पाणी प्याले. नंतर त्याने पाण्यात पहिले. पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याला त्याची शिंगे उंच, दणकट, पसरट आणि सुंदर दिसू लागली. त्याला खूप आनंद झाला. थोड्या वेळाने त्याचे लक्ष पायांकडे गेले.पाय वाळलेल्या काटक्यांसारखे वाटले. त्याला खूप वाईट वाटले.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) सांबर कोठे राहत होते ?
२) सांबर तळ्यावर कशासाठी गेले होते ?
३) सांबर पाणी पिण्यासाठी कोठे गेले ?
४) सांबराने तळ्यावर पाणी पिले का ? 
५) सांबराने पाण्यात काय पाहिले ?
६) सांबराला पाण्यात कोणाचे प्रतिबिंब दिसले ?
७) सांबराची शिंगे कशी होती ? 
८) उताऱ्यातील खालील शब्दांना विरुद्ध अर्थी शब्द शोध.
उंच, दणकट, पसरट, सुंदर, आनंद, नंतर, वाईट, लक्ष, स्वतःचे
९) सांबराला आनंद का झाला ?
१०) सांबराचे लक्ष कोठे गेले?
११) सांबराला स्वतःचे पाय कसे वाटले.
१२) सांबराला वाईट का वाटले ?
१३) एका जंगलात एक ........ राहत होते.
१४) पाय वाळलेल्या ....... सारखे वाटले.
१५) शिंगे असणाऱ्या प्राण्यांची नावे लिही.
१६) उताऱ्यात किती जोडाक्षरे आली आहेत. उताऱ्यातील जोडाक्षरे ५ वेळा लिहा.