⚜️ चवळीताईचे पत्र⚜️

⚜️ चवळीताईचे पत्र⚜️


 कु. चवळीताई वाटाणेराव वाल
 मु.पो. भाजी मंडई
ता. सब्जीद्वार
जि. माळीवाडा
    तिर्थस्वरूप कारले काका आणि सौ. दोडके ताई यांना कु. चवळीताईचा स.न.वि.वि.
      श्री. हरबरे काका व रताळे दादा मुंबईला गेले आहेत. पाठोपाठ कांदेदादा व वांगीताई पोहचल्या आहेत. तसा त्यांचा पोहचल्या पोहचल्या मला मोबाईल आला होता.
     वैशाख महिन्यात आमच्या मिरचीताईचे लग्न श्री. बटाटेराव याच्यांशी होणार असून आपण लग्नास अवश्य यावे ही आग्रहाची विनंती किले. हिच पत्रिका समजावी. लग्न आपल्याच घरी भाजी मंडईत होणार आहे.
      परवा गाजर तात्या टोपलीतून धक्का लागल्याने खाली पडले. त्यांना मोठी दुखापत झाली. वेळीच टोमॅटोरावांनी रक्त दिल्याने त्यांची प्राणज्योत मावळता मावळता पुन्हा एकदम तेजोमय झाली आहे.
      बटाटेराव जिन्यातून घरंगळत खाली पडले. नशीब थोर, सुदैवानं त्यांना फारशी दुखापत झाली नाही.
     भेंडीताई सध्या ५ वी त्या गेल्या आहेत. यंदा लसुन भाऊ व कोथिंबीर बाईंना के जी. मध्ये घातले आहेत.
     कालच कापूस काका व मोहरी मावशी आमच्याकडे आले होते. बाकी सर्व ठीक आहे. 
आम्हा सर्व कुटुंबियांचा तुम्हा सर्व कुटुंबियांना स.न.
       
                                                                 कळावे
                                                               आपलीच
                                                            कु. चवळीताई