⚜️अति तेथे माती⚜️

    ⚜️अति तेथे माती⚜️

     एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, ‘काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला  समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.’ आणि मला तसे आवडणार नाही.
  त्यावर बगळा म्हणाला, ‘माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.’ असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला  मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.
तात्पर्यः- कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.