⚜️काय निवडायचं ?⚜️
फटाके 💥की पुस्तके📚
फटाके मोठा आवाज करतात.
पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात.
फटाके हवेचं प्रदूषण करतात.
पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात.
फटाके अक्षरशः पैसे जाळतात.
पुस्तके मात्र पैसे उभे करतात.
फटाके लहानग्यांना इजा करतात
पुस्तके बाळांना छान रमवतात
फटाके पक्षी प्राण्यांना घाबरवतात
पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात
फटाके कान किर्रर करुन सोडतात.
पुस्तके मानसिक समाधान देतात.
फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात.
पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात.
फटाके विध्वंसक मूल्य रुजवतात.
पुस्तके रचनेचा आग्रह धरतात.
फटाके क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात.
पुस्तके तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.
फटाके म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन.
पुस्तके म्हणजे बालबुद्धीला आवाहन.
फटाके ही तर खरीखुरी विकृती.
पुस्तकेच उभी करती मानवी संस्कृती.
भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा
फटाक्यास फाटा देवूनि पुस्तकेच वाटा
आता काय निवडायचं तुम्हीच ठरवा !
विवेकाचा आवाज बुलंद करुंं या
=============================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com