⚜️आईचे प्रेम⚜️

⚜️आईचे प्रेम⚜️

     एका परीने एकदा जाहीर केले, "ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात सुंदर  असेल, त्याला मी छान बक्षीस देईन."
       ते एकूण  सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्या बरोबर आपली पिले आणली होती. परीने एका मागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही."
    परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी धरले आणि ती पिलाच्या कानात कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ  नकोस. माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."

तात्पर्यः- आईच्या  प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.