⚜️उतारा वाचन भाग ७३⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ७३⚜️

    दिवाळी जवळ आली कि तुकाराम पणत्या तयार करु लागतो. त्याच्या वाड्याचा सोपा या पणत्यांनीच भरुन जातो. दिवाळीत या पणत्या घरोघर तेवताना दिसतात.रात्री दुरुन पाहिले कि, चांदण्याच चमकत आहेत असे वाटते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) दिवाळी जवळ आली कि कोण पणत्या तयार करतो ?
२) पणत्यांनीच तुकारामाचा काय भरून जातो ?
३) दिवाळीत घरोघर काय तेवताना दिसते ?
४) काय बघितल्यावर रात्री चांदणेच चमकत असल्याचे वाटते ? 
५) पणत्या कोण तयार करतो ?
६) वरील उताऱ्यात कोणत्या सणाचा उल्लेख आला आहे ?
७) उताऱ्यातील जोडाक्षरे शोध.
८) जसे पणती पणत्या तसे घर -
९) दिवस या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिही.
१०) तुकाराम या शब्दपासून अर्थपूर्ण छोटे छोटे शब्द बनवा.
११) जसे दिसणे - दिसतात
तसे हसणे -
१२) दिवाळीत बहीण भावाला ओवाळते, तो सण कोणता असतो ?
१३) तुम्ही दिवाळीत काय काय मज्जा करतात ते लिहा./ दिवाळी सणाविषयी पाच ओळी माहिती लिहा.
(१४) तुम्हाला माहित असलेल्या सणांची नावे लिहा.
१५) प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही काय कराल?