⚜️ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून⚜️

 ⚜️ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून⚜️

ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून|| धृ ||

नेसून शुभ्र पातळ | गळा घालूनी मौक्तिक माळ
कटी कंबरपट्टा कसूनी शारदे, मयुरावरती बसून ||१||

हाती घेवूनी टाळ वीणा | मंजुळ करील गायना
ये भजनामध्ये बसूनी शारदे, मयुरावरती बसून ||२||

तुझा अगाध महिमा किती। मुक्यास वेद वदविती
ये नाचत नाचत हसूनी शारदे, मयुरावरती बसून ||३||

तुका म्हणे ब्रम्हानंदिनी | मम हृदयी सिंहासनी 
 ये अंतरज्ञाना ठसूनी शारदे, मयुरावरती बसून ||४||

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.