⚜️झेंडा आमुचा⚜️

⚜️झेंडा आमुचा⚜️

झेंडा आमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ||धृ || 

या देशाची पवित्र माती, जुळवी आमच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान ||१||

 लढले गांधी यांच्या करीता, टिळक-नेहरू लढली जनता समरधुरंदर वीर खरोखर, अर्पूनी गेले प्राण ||२||

 भारत माता आमुची माता, आम्ही गातो त्या जयगीता  हिमालयाच्या उंच शिरावर, फडकत राही निशाण ||३||

 गगनावरि अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटा लहरी 
जय जय भारत, जय जय भारत, गातो मी जय गान.... ||४||

गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.