⚜️लोभी वाघ⚜️

 ⚜️लोभी वाघ⚜️

          उन्हाळ्यात एके दिवशी जंगलातील वाघाला खूप भूक लागली म्हणून तो इकडे तिकडे आपले भक्ष्य शोधू लागला, काही वेळाने शोध घेतल्यावर त्याला एक ससा सापडला पण तो खाण्याऐवजी त्याने ससा सोडून दिला कारण तो खूप लहान होता.
     मग काही वेळ शोधाशोध केल्यावर त्याला वाटेत एक हरीण दिसले, तो त्याच्या मागे गेला पण तो बराच वेळ भक्ष्याच्या शोधात असल्याने तो थकला, त्यामुळे त्याला हरीण पकडता आले नाही. 
    आता जेव्हा त्याला खायला काहीच मिळाले नाही, तेव्हा तो ससा खाण्याचा परत विचार करू लागला, तो परत त्याच ठिकाणी आला तेव्हा तिथे कुणीच दिसले नाही. कारण तोपर्यंत ससा तिथून निघून गेला होता, आता वाघ खूप दुःखी झाला होता. त्याच्याकडे उपाशी राहण्यावाचून कुठलाही पर्याय नव्हता.
तात्पर्य : -  जास्त लोभ करणे कधीही फलदायी नसते.