⚜️सुटली ग शाळा⚜️
सुटली ग शाळा फुटली ग पाटी,
दे मला आई खाऊची वाटी ||धृ||
आज आम्ही शाळेत केली कार मज्जा,
आमच्या मोठ्या बाईची आज होती रजा
मीच झाले बाई घेवून हाती काठी ||१||
एक होता रड्या एक होता जाड्या,
दोघे मिळून वर्गात करत होतो खोड्या
मीच दिली त्यांना शिक्षा खोटी खोटी ||२||
रडू बाई रडू, एक होती ठकी,
मी तिला करायला लावली वजाबाकी
नाही तर माझी, लागेल तुझ्या पाठी ||३||