⚜️ठेव कुणासाठी⚜️
या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे.
पुत्र ही सुनेची ठेव आहे. कन्या ही जावयाची ठेव आहे. जिवन हे मुत्युची ठेव आहे. आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे.
एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल. मुलीला जावाई घेऊन जाईल. जिवन मुत्युंला शरण जाईल. आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल.
जिवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा. तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका.
आपण कितीही हुशार असलात तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंत:करनाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याच पोट कधी भरत नाही. आणि वाटुन खाणारा कधी उपाशी मरत नाही.
हाच खरा जिवनसार आहे.
=============================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com