⚜️ विद्याधन उपक्रम - सामान्यज्ञान⚜️
⚜️जगातील सर्वात उंच, जास्त, प्रथम, लहान, मोठे⚜️
उत्तरसूची
(१) जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणते ?
उत्तर:- गोरखपूर (उत्तरप्रदेश )
(२) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर:- सहारा वाळवंट
(३) जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर:- माऊंट एव्हरेस्ट
(४) जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती ?
उत्तर:- भारताची
(५) जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तर:- मोसीनराम
(६) जगातील सर्वात मोठे ग्रंथालय कोणते ?
उत्तर:- लायब्ररी ऑफ काँग्रेस
(७) जगातील सर्वात मोठा देश कोणता ?
उत्तर:- रशिया
(८) जगातील सर्वात मोठे बंदर कोणते ?
उत्तर:- सिडनी
(९) जगातील सर्वात मोठी मशिद कोणती ?
उत्तर:- जामा मशिद
(१०) जगातील सर्वात मोठा राजवाडा कोणता ?
उत्तर:- व्हॅटिकन राजवाडा
(११) जगातील सर्वात लहान खंड कोणता ?
उत्तर:- ऑस्ट्रेलिया
(१२) जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?
उत्तर:- आशिया
(१३) जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता ?
उत्तर:- सुंदरबन
(१४) जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग कोणता ?
उत्तर:- ट्रांन्स सैबेरियन
(१५) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?
उत्तर:- एंजल धबधबा
(१६) जगातील सर्वात उंच धरण कोणता ?
उत्तर:- जीनपिंग आय ( चीन)
(१७) जगातील सर्वात लांब धरण कोणते ?
उत्तर:- हिराकूड
(१८) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर:- नाईल
(१९) जगातील सर्वात मोठी / रुंद नदी कोणती ?
उत्तर:- अॅमेझॉन
(२०)जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?
उत्तर:- चीनची भिंत
(२१) जगातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ कोणते ?
उत्तर:- अटलांटा (अमेरिका )
(२२) जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते ?
उत्तर:- शांघाय ( चीन )
(२३) जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता ?
उत्तर:- चीन
(२४) जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता ?
उत्तर:- व्हॅटिकन सिटी
(२५) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर:- शहामृग
(२६) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
उत्तर:- हमिंगबर्ड
(२७) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता ?
उत्तर:- जिराफ
(२८)जगातील जमिनिवरील सर्वात मोठा प्राणी कोणता ?
उत्तर:- हत्ती
(२९) जगातील सर्वात मोठा जलचर प्राणी कोणता ?
उत्तर:- निळा देवमासा