⚜️कोकण⚜️

⚜️कोकण⚜️

झाडावरून पडला आंबा 
टुणकन जाऊन पेटीत बसला
फणसबुवा हळूच हसला 
हळूच जाऊन टोपलीत बसला
आंब्याची पेटी फणसाची टोपली 
सरकत सरकत बोटीत बसली
भो भो वाजला भोंगा 
उभा होता मुंबईचा टांगा
टांगा मोटार झाली टक्कर 
फणसबुवांना आली चक्कर
आंबा गेला गड्गडत 
फणसबुवा धड्पडत
आंबा झाला पिवळा पिवळा 
फणसाचा झाला लोळा गोळा
नको रे बुवा मुंबईची हवा 
कोकण आपले बरे बुवा !!