⚜️उंदीरमामा⚜️

⚜️उंदीरमामा⚜️

उंदीरमामा बिळातूनि, 
हळूच बघती वाकोनी 
शिंक्यावरती डबा दिसे, 
सभोवताली कोणी नसे 
भूक लागली त्या भारी, 
उडी मारली डब्यावरी 
धडामधुडूमधूम डबा पडे, 
घाबरगुंडी फार उडे