⚜️राणीचे गाणे⚜️
कांदे चिरायला बसली राणी,
तिच्या डोळ्याला आले पाणी.
पाण्याचे झाले मोठे तळे,
त्यात उगवली दोन कमळे.
दोन कमळ्यांत एकच परी,
दोरीवरच्या उड्या मारी.
एक उडी घाईत चुकली,
बिचारी परी पाण्यात पडली.
पाणी गेले सगळे आटून,
परीच्या पंखांनी परी गेली उडून.
परीला पाहून राणी हसली,
कांद्याची चटणी खमंग झाली.