⚜️माकडाचे दुकान⚜️

⚜️माकडाचे दुकान⚜️

एका माकडाने काढलय दुकान 
आली गिऱ्हाइके छान छान
मनीने आणले पैसे नवे 
म्हणाली शेटजी, उंदिर हवे 
छान छान...
अस्वल आले नाचवित पाय 
म्हणाले मधाचा भाव काय  
 छान छान...
कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा
आणि म्हणाला मांडून ठेवा
माकड म्हणाले लावुन गंध
आता झालय दुकान बंद
छान छान...