⚜️अग्गोबाईऽऽऽ ढग्गोबाईऽऽऽ⚜️
ढगाला उन्हाची लागली झळ
थोडी न थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.......धृ.
वारा वारा गरागरा सो सो सुम्
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढोल्या ढोल्या ढगात दूम ढूम ढूम
वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी
आभाळाच्या पाठीवर छमछम छडी........१
खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबुबिबु नको थोडा चिखल लगाव......२
हाशहुश् उन्हाळ्याने काढताच बंडी
गार गार पावसात भरू लागे थंडी
कुडकुड थंडी मारे कडकड मिठ्या
दातभाऊ खेळतात कशा आट्यापाट्या.......३