⚜️फुग्या फुग्या का फुगलासं ?⚜️
का रे बाबा रुसलासं?
आई रागे भरली तुला,
कंटाळून तव पी पी ला
असाच जर तू फुगशीलं,
फटकन फुटून जाशीलं,
बसून माझ्या पिशवीतं
चल रे जाउ बंदरातं!
जमतील कितीतरी बालगडी
नेतील तुजला मग कोणी
मिळेल पैसा मम पोटा
फेरी वाला मी छोटा