⚜️म्हातारी आणि वाघोबा⚜️
जंगल झाडीत वाघोबा लपले
म्हातारीला बघून खुदकन हसले
"अग अग म्हातारे कुठे चालली,
खाऊ दे मला आता भूक लागली
"थांब थांब वाघोबा मला जाऊदे
लेकीचे लाडू मला खाऊ दे
लाडू खाउन होउन मी ताजी
मग कर हवी तर माझी खुशाल भाजी"
दोनचार दिवसानी गंमत झाली
भोपळ्यात बसून म्हातारी आली.
वाघोबाने भोपळा अडविला
भोपळ्याच्या आतून आवाज आला
"म्हातारी बितारी मला नाही ठाउक
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक"