⚜️उतारा वाचन भाग ८१⚜️
वडाच्या झाडाला वटवृक्ष असे म्हणतात. वडाचे झाड हे विशाल अजस्त्र असे झाड आहे वडाच्या झाडाची उंची साधारणतः सुमारे तीस मीटर उंच असते. वडाचे हे सदापर्णी वृक्ष आहे.
वडाच्या झाडाच्या फांदयांना पारंब्या सुद्धा म्हणतात. वडाचे झाड हे प्रत्येक पारंब्या पासून फांदी पासून व पानांमधून निर्माण होते. वडाच्या झाडाचे आयुष्य दे खूप दीर्घ असते.
वडाच्या झाडाच्या फांदया जमिनीला समांतर दिशेने वाढतात. वडाच्या झाडाला मार्च महिन्यात फळे लागतात. वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष किंवा संसार वृक्ष असेही म्हणतात.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) 'वटवृक्ष' कोणत्या झाडास म्हणतात ?
२) कोणते झाड हे विशाल व अजस्र असते ?
३) वडाच्या झाडाची उंची किती असते ?
४) सदापर्णी वृक्ष कोणता ?
५) वडाच्या झाडाच्या फांद्यांना काय म्हणतात ?
६) वडाचे झाड हे कसे निर्माण होते ?
७) वडाच्या झाडाचे आयुष्य किती असते ?
८) वडाच्या झाडाच्या फांदया जमिनीच्या दिशेने कशा वाढतात ?
९) वडाच्या झाडाला कोणत्या महिन्यात फळे लागतात ?
१०) वडाच्या झाडाला काय म्हणतात ?
११) 'वडाचे' या शब्दात कोणत्या खाण्याच्या पदार्थाचे नाव लपले आहे ?
१२) वचन बदल.
- फळा
- झाड
१३) 'झाड' या शब्दाला समानार्थी शब्द लिही.
१४) तुला माहित असलेले वडाच्या झाडाचे फायदे सांग.
१५) वडाचे चित्र काढून रंगव.