⚜️परीचे गाणे⚜️
एक होती परी, खूप खूप गोरी,
अन छोटीशी सुंदर छान छान भारी.
एकदा काय झाले? एकदा काय झाले?
आकाशाच्या गंगेला पूर मोठा आला,
अन परीचा बंगला वाहूनच गेला
रड-रड रडली, रड-रड रडली,
अन धावतच चांदोबाच्या घरी तीगेली.
चांदोबा म्हणाला दात-ओठ खाऊन,
नदीतच घर तुला देतो मी बांधून.
तेव्हापासून परी नदीतच गेली,
अन लाटांच्या घराची मालकिण झाली.
अशी होती परी, खूप खूप गोरी,
अन छोटीशी सुंदर छान छान भारी.