⚜️विद्याधन भाषिक सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️

 ⚜️विद्याधन  भाषिक सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️

उत्तर सूची


(1) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर - पोळे

(2) घोडयाच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर - तबेला

(3) कोंबडीच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर- खुराडे

(4) उंदराच्या घराला काय म्हणतात ? 
उत्तर :-  बीळ

(5) चिमणीच्या घराला काय म्हणतात ? 
उत्तर :-  घरटे

(6) सिंहाच्या निवा-यास काय म्हणतात ?
उत्तर :-  गुहा

(7) माणसाच्या निवा-यास काय म्हणतात ? 
उत्तर :-  घर

(8) वाघाच्या निवा-याला काय म्हणतात ? 
उत्तर :-  गुहा

(9) गाई-गुरांना बांधण्याच्या जागेस काय म्हणता
उत्तर :-  गोठा

(10) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर :-  थवा

(11) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर :-  गुच्छ

(12) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर :-  ताटवा

(13) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर :-  बेट

(14) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ? 
उत्तर :-  हंबरणे

(15) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ? 
उत्तर :-  रेकणे

(16) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ? 
उत्तर :-  रेडकू

(17) घोडयाच्या पिल्लाला काय म्हणतात ? 
उत्तर :-  शिंगरु

(18) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ? 
उत्तर :-  बच्चा, बछडा

(19) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ? 
उत्तर :-  वासरू

(20) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ? 
उत्तर :-  पाडस, शावक

(21) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर :-  करडू

(22) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर :-  पिल्लू

(23) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर :-  छावा

(24) मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ? 
उत्तर :-  कोकरू

(25) गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर :- शिंगरु