⚜️नाच रे मोरा⚜️

⚜️नाच रे मोरा⚜️ 

नाच रे मोरा, मोबाईलच्या स्क्रीनवर, 
नाच रे मोरा नाच ..... ।।धृ।।

आईने मोबाईल दिला रे, WiFi त्याला जोडला रे, 
आता तुझी पाळी, यु ट्यूब देते टाळी, 
फुलव पिसारा नाच।।१।।

झरझर डाउनलोड झालं रे, खोटं खोटं जंगल दिसलं रे
 likes च्या पावसात न्हाऊ, आनंदाने गाऊ,
 करून पुकारा नाच, नाच रे मोरा ।।२।।

तुझं माझं मैत्र जमलं रे wifi recharge संपलं रे, 
Photography युगात, आभासी जगात,
 क्षणभरासाठी नाच, नाच रे मोरा नाच ।।३।।

नाच रे मोरा, मोबाईलच्या स्क्रीनवर, 
नाच रे मोरा नाचा