⚜️असे कसे....⚜️

⚜️असे कसे....⚜️

 असे कसे हो असते मोठ्यांचे वागणे 
एकदा एक बोलणे आणि एकदा एक बोलणे......
असे कसे..

लवकर उठलं तर म्हणतील नीज अजुन थोडा 
आणि उशिरा उठलं तर म्हणतील पसरलाय घोडा..... 
असे कसे..

अभ्यास केला तर म्हणतील पुस्तकातला किडा 
आणि नापास झालं तर म्हणतील परिक्षेतला वेडा.... 
असे कसे....

एकदा म्हणतील बाबा रे दया करायला शिक 
आणि केली तर म्हणतील गधड्या लावशील मला भीक..... 
असे कसे..

कधी आजारी पडले तर मग मात्र म्हणतात 
पिंकी आमची गुणाची एव्हढेच खरे बोलतात..... 
असे कसे..